लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ बंद !

लंडन (ब्रिटन) – येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होता. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह क्रांतीकारकही राहिले होते. तेथे त्यांचे येणे-जाणे होते. ‘इंडिया क्लब’ हे ब्रिटनमधील भारतीय उपाहारगृहांपैकी एक होते आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर ते ब्रिटीश दक्षिण आशियाई समुदायाचे केंद्र बनले. पारसी समाजातील असणारे क्लबचे व्यवस्थापक फिरोजा मार्कर यांनी सांगितले, की, आम्ही क्लब बंद करत असलो, तरी हा क्लब स्थलांतरित करण्यासाठी नवीन परिसर शोधत आहेत.