युक्रेनी नागरिकांकडून हिंदूंचा योगाभ्यास आणि ध्यानधारणा !

युद्धामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत असल्याने शांतता लाभण्यासाठी निर्णय

कीव्ह (युक्रेन) – रशियाकडून होत असलेल्या बाँब वर्षावामुळे जीव मुठीत धरून रहाणारे अनेक युक्रेनी नागरिक आता हिंदूंचा योग आणि ध्यानधारणा यांचा आश्रय घेत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक आज भल्या सकाळी योगाभ्यास करण्यासाठी एकत्र येत आहेत. योगाभ्यासाचे असेच एक केंद्र हे डोनेस्क प्रांतातील क्रामटोरस्क शहरात भरते. आठवड्यातील ३ दिवस लोक येथील एका तळघरात जमतात आणि सात्त्विक संगीत लावून ध्यानधारणा आणि योगाभ्यास करतात.

५२ वर्षीय योग प्रशिक्षक सेरही जालोजनी यांनी यासंदर्भात सांगितले की, येथील जनतेचे बाहेरील जग पुष्कळ अशांत असून प्रत्येक काही घंट्यांनी होत असलेल्या बाँबस्फोटांमुळे त्यांची मने अधिकच अशांत होतात. येथील लोक शांततेसाठी व्याकूळ झाले आहेत. योगाभ्यास करूनच त्यांच्या मनाला शांती लाभत आहे.

संपादकीय भूमिका 

  • एकीकडे पाश्‍चात्त्य जग हिंदु धर्माच्या अद्वितीय शिकवणीपुढे नतमस्तक होऊन ती अंगीकारल्याने स्वत:च्या जीवनात शांतता अन् आनंद अनुभवतात, तर दुसरीकडे भारतातील हिंदू त्याकडे पाठ फिरवून पुरोगामीपणाचा टेंभा मिरवत फिरतात !
  • सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍या नतद्रष्ट राजकीय नेत्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?