मडगाव येथे एकूण ५६ सहस्र ४०० रुपये किमतीचे खाद्यपदार्थ जप्त

मडगाव कदंब बसस्थानकावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून २ पिशव्यांमध्ये भरून आणलेला ३८ सहस्र ४०० रुपये किमतीचा जवळजवळ १२ किलो खवा जप्त करण्यात आला आणि तो नष्ट करण्यात आला.

नरकासुर प्रतिमा मिरवणुकीच्या वेळी आवाज मर्यादित ठेवण्याचा मानवाधिकार आयोगाचा आदेश

वर्षानुवर्षे दिवाळीच्या पूर्वसंध्येला निघणार्‍या नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकांमुळे होणार्‍या गोंगाटामुळे आणि सहन न होणार्‍या संगीतामुळे वृद्ध अन्  रुग्ण व्यक्तींना त्रास होतो. यावर्षी तरी त्याला आळा बसावा, अशी मागणी अनेकांकडून होत आहे. 

गोव्यात नेपाळ, बांगलादेश यांबरोबरच देहली, बंगाल आणि महाराष्ट्र येथून वेश्या व्यवसायासाठी युवती येतात ! – अन्याय रहित जिंदगी

गोवा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी वेश्या व्यवसाय करणे संबंधितांना सुलभ होते. या ठिकाणी ग्राहकसंख्याही अधिक असल्याने पैसेही चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे युवती याकडे आकर्षित होत असतात.

चांदीच्या नाणे वाटपासाठी पुणे विद्यापिठाचा लाखो रुपये खर्च !

विद्यापिठाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याचे सांगितले जात असतांना चांदीच्या नाण्यांवर खर्च करण्याची काय आवश्यकता ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ईश्वरपूर येथे दुकानातून खाद्यपदार्थ चोरणार्‍या टोळीला अटक !

आरोपींकडून पोलिसांनी छोटा हत्ती वाहन मिळून ३.९६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.

आपली ओळख ‘हिंदु’ आहे, हे ठसवल्याविना आपल्यावरील इस्लामी संकट संपणार नाही ! – सात्यकी सावरकर

केडगाव (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्‍या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

अखेर नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला !

दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून प्रचलित बाजारभावापेक्षा अल्प किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेला होता.

हिंदु धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांना आगामी निवडणुकीत मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

पुढे बोलतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्त्वाचे आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पुणे येथे गटाराच्या झाकणावर फटाके फोडतांना चेंबरमधील गॅसमुळे स्फोट !

स्फोटांमुळे गटाराचे झाकणही हवेत उडाले. या झाकणाचे तुकडे मुलांना लागल्याने मुले घायाळ झाली.

भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांचा सकल जैन समाजाद्वारे सत्कार !

जैन आर्थिक विकास महामंडळाची महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्थापना केली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.