३.९६ लाख रुपयांचा माल जप्त !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २९ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील नमकीन व्यापारी संस्कार अग्रवाल यांच्या दुकानातून शेव, बुंदी, वेफर्स, चॉकलेट असे खाद्यपदार्थ चोरणार्या तिघांच्या टोळीला राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी छोटा हत्ती वाहन मिळून ३.९६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. अरुण गौडा (वय २१ वर्षे), जितू पटेल (वय १९ वर्षे), हनुमान पटेल (वय २७ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.