१२ वर्षांनंतरच्या महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत

महाकुंभ १२ वर्षांतून एकदा येतो, प्रतिवर्षी येत नाही. जत्रा प्रतिवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात; मात्र कुंभ हा हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि वाराणसी येथे होतो. त्यामुळे महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करायला हवे

नागपूर विद्यापिठाचा दीक्षांत समारोह रहित !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे दोन्ही दीक्षांत समारोह अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. येत्या काळात ‘ऑनलाईन’ पद्धतीने हे समारोह आयोजित केले जाऊ शकतात. त्या दृष्टीने विचार चालू आहे.

चारधामसह ५१ मोठी मंदिरे सरकारीकरणातून लवकरच मुक्त करणार !

तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !

देहलीतील एम्स् रुग्णालयातील ३० डॉक्टरांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीची परिणामकारकता ७० ते ८० टक्के आहे. याचा अर्थ २० ते ३० टक्के लोक लस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित होऊ शकतात.

भोपाळमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल !

असा अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍या रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे !

(म्हणे) ‘हिंदु आणि मुसलमान मतांच्या विभाजनाला विरोध करणार !’ – ममता बॅनर्जी यांचे फुकाचे बोल

स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !

काश्मीरमध्ये २ वेगवेगळ्या चकमकीत ७ आतंकवादी ठार !

‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे या गोष्टींवर का बोलत नाहीत ? 

हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या पत्नीला ६९ वर्षांनी मिळाले निवृत्ती वेतन !

सरकारी कार्यालयाची अक्षम्य चूक ! सैनिक देशासाठी स्वतःचे प्राणत्याग करतात; मात्र सरकारी कर्मचार्‍यांना त्याविषयी कोणतीही संवेदना नाही, हे लज्जास्पद आहे ! अशा चुका करणार्‍यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

कोल्हापूर येथील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती विसर्जित !

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने तेथील सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ती कुठल्याही राजकीय पक्षांच्या किंवा प्रशासनाच्या नव्हे, तर भक्तांच्याच कह्यात हवीत !

देशातील ५० टक्के कोरोनाबाधित रुग्ण असणार्‍या महाराष्ट्राला लसींचे वाटप अल्प प्रमाणात का ? – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

आताच्या आकडेवारीनुसार एका आठवड्याला उत्तरप्रदेशला ४८ लाख, मध्यप्रदेशला ४० लाख, गुजरातला ३० लाख, तर हरियाणाला २४ लाख असे लसींचे वाटप झाले; मात्र देशातील ५० टक्के कोरोनाबाधित रुग्ण असणार्‍या महाराष्ट्राला केवळ ७ लाख ५० सहस्र लसींचे डोस दिले आहेत.