काश्मीरमध्ये २ वेगवेगळ्या चकमकीत ७ आतंकवादी ठार !

शोपिया येथे मशिदीत लपले होते आतंकवादी !

‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे या गोष्टींवर का बोलत नाहीत ?

शोपिया (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये त्राल आणि शोपिया या २ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ७ आतंकवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले. शोपिया येथील जन मोहल्ला भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना ठार केले. या चकमकीत ‘अन्सार गजवा तुल हिंद’ या आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर मारला गेला. ही संघटना ‘जैश ए महंमद’चाच भाग आहे. हे आतंकवादी जीव वाचवण्यासाठी एका मशिदीमध्ये लपले होते. तेथून ते सुरक्षादलांवर गोळीबार करत होते. या आतंकवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, यासाठी सुरक्षादलाचे प्रयत्न चालू होते. ८ एप्रिलच्या सायंकाळपासून येथे चकमक चालू होती. या चकमकीमध्ये ४ सैनिक घायाळ झाले आहेत.

याआधीही आतंकवाद्यांनी लपण्यासाठी मशीद आणि दर्गा यांचा केला आहे वापर !

१. १५ ऑक्टोबर १९९३ या दिवशी ४० आतंकवादी हजरतबल दर्ग्यामध्ये एक मास लपले हेते. नंतर त्यांनी शरणागती पत्करली होती.

२. मार्च १९९५ मध्ये बडगाम जिल्ह्यातील चरार-ए-शरीफ भागातील शेख नूरूद्दीन नुरानी यांच्या दर्ग्यामध्ये हरकत उल अंसार आणि हिजबुल मुजाहिदीन यांचे आतंकवादी ६६ दिवस लपले होते. १२ मे या दिवशी झालेल्या चकमकीत ९ पाकिस्तान्यांसह २५ आतंकवादी ठार झाले होते.

३. वर्ष १९९६ मध्ये जे.के.एल्.एफ्.चा कमांडर बशारत रजा आणि शब्बीर सिद्दीकी यांनी २५ हून अधिक आतंकवाद्यांसह दर्ग्यामध्ये आश्रय घेतला होता. तेथून त्यांनी पोलिसांवर आक्रमण केल होते. या वेळी झालेल्या कारवाईत सर्व आतंकवादी ठार झाले, तर ३ पोलीस हुतात्मा झाले होते.

४.  १९ जून २०२० या दिवशी पुलवामामधील पंपोरमध्ये आक्रमण करून आतंकवादी मशिदीत लपले होते. सुरक्षादलांनी त्यांना बाहेर काढून ठार केले होते.

५. जुलै २०२० मध्ये मेंसोपोर येथील मशिदीत लपलेल्या आतंकवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पेट्रोलिंग पथकावर आक्रमण केले होते.