महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १८१
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८१ पर्यंत पोचली आहे. मुंबईमध्ये नवीन ७ रुग्ण आढळले आहेत, तर नागपूर येथे १ नवीन रुग्ण आढळला आहे.
कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो.
मूळचे रत्नागिरीतील असलेल्या ३४ खलाशांवर प्रशासनाकडून गुन्हे नोंद
‘मला क्षमा करा. काही जण मरणारच आहेत. वाहतुकीमुळे एखाद्याचा मृत्यू होतो; म्हणून तुम्ही एका चारचाकी वाहनाचा कारखाना बंद करू शकत नाही’, असे विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी त्यांच्या घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने कर्मचार्यांसाठी सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे.
‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.
इटलीमध्ये आतापर्यंत ५ सहस्रहून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात १९५ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण आणि व मृत यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ लाख ९७ सहस्र २६७ झाली असून २७ सहस्र ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !
कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.