सिंधुदुर्गात २८ जानेवारीला सरपंचपद आरक्षण सोडत

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. ही आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्‍चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ची स्थापना

शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविषयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे आणि दिलासा देणे, हा या योजनेचा उद्देश आहे

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ जानेवारीला आंदोलन करण्याची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.

‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे निधन

गांधीवादी विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जुन्या काळातील पत्रकार, साहित्यिक आणि गोव्यातील ‘मार्ग’ चळवळीचे प्रवर्तक गुरुनाथ केळेकर यांचे १९ जानेवारी या दिवशी पहाटे निधन झाले.

गांजाचा अंश असणार्‍या औषधांद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील ! – कॅनडातील संशोधकांचा दावा

कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठाने गांजाचा वापर करून कोरोनाचा सर्वाधिक धोका असणार्‍या वयोगटातील आणि गंभीर आजार असणार्‍यांना वाचवता येऊ शकते, असा दावा केला आहे.

मालवण येथे वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी पर्यटन व्यावसायिकांचे आंदोलन

कोरोना महामारीचा मोठा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या कालावधीतील वीजदेयके पर्यटन व्यावसायिकांना माफ करावीत, या मागणीसह आंदोलन चालू केले आहे.

‘सरफरोश २’ हा चित्रपट ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना समर्पित ! – चित्रपटाचे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन

‘सरफरोश २’ चित्रपट भारताच्या अंतर्गत सुरक्षेविषयी आहे. विविध समस्या असतांनादेखील भारताची अंतर्गत सुरक्षा किती भक्कम आहे, हे यातून दाखवले जाईल. या समस्या झेलणार्‍या ‘सीआरपीएफ्’च्या सैनिकांना हा चित्रपट समर्पित करत आहे.

चित्रपटांतून प्रत्येक वेळी हिंदु धर्मालाच लक्ष्य का करण्यात येते ? – मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे रक्षण करावे, असे हिंदूंना वाटते !

मारहाण प्रकरणी रमेश तवडकर निर्दोष

भाजपचे नेते आणि माजी मंत्री रमेश तवडकर यांना वर्ष २०१७ मधील मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे.

योजनाबद्ध पद्धतीने हिंदु धर्माला अवमानित करण्याचे काम केले जात आहे ! – कलाकार राजू श्रीवास्तव

हिंदु धर्माचा वारंवार होणारा अवमान थांबण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे!