मी ४ ते ५ दिवसांत बरा होऊन घरी जाईन ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुषमंत्री

माझे आरोग्य आता सुधारत आहे.मला भेटण्यासाठी कुणीही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येऊ नये. घरी गेल्यावर मी सर्वांना भेटेन, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

‘गोवा लोकायुक्तां’च्या नियुक्तीस उच्च न्यायालयाकडून आणखी २ मासांचा अवधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.  

पालिका निवडणूक ३ मासांनी पुढे ढकलली

राज्य निवडणूक आयोगाने भारतीय घटनेचे कलम २४३ (के) आणि २४३ (झेड्. ए.) यांनुसार राज्यातील ११ नगरपालिका मंडळे, पणजी महानगरपालिका, ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आणि नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघाची निवडणूक ३ मासांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले आणि हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली.

चाफळ (जिल्हा सातारा) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.

चिखली (जिल्हा बुलढाणा) मतदारसंघात ब्राह्मण समाजावर कधीही अन्याय होणार नाही ! – आमदार श्‍वेता महाल्ले 

ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्‍वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सौ. श्‍वेता महाल्ले यांनी केले.

पुण्यातील कोरड्या कचर्‍यात खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्वाधिक

पर्यावरणासाठी घातक अशा या कचर्‍याविरोधात ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लास्टिक’ ही चळवळ विविध देशांत राबवण्यात येत आहे. ‘या आस्थपनांनी पुनर्वापरास योग्य पिशव्यांचा वापर करावा’, अशी मागणी कचरावेचक संस्थांनी केली आहे.

किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.