महानगरपालिकेकडूनच नियमांचे उल्लंघन होऊ लागले, तर कोरोनावर नियंत्रण कसे आणणार ?
पुणे, २१ मार्च – कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करतांना महानगरपालिका यंत्रणेकडून अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोनाचा अहवाल वेळेत न मिळणे, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा पाठपुरावा न करणे, तसेच रुग्णांच्या दारावर विलगीकरणाचा फलक लावणे, रुग्णाच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारणे हे आदेश केवळ कागदावर राहिले आहेत. त्यांची पूर्तताच होत नाही.