श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या अध्यक्षपदी मेघशाम नारायणपुजारी यांची निवड

श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानच्या विश्‍वस्तांची बैठक येथील दत्त देव संस्थानच्या सभागृहात झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून मेघशाम नारायणपुजारी आणि सचिव म्हणून महादेव वसंत पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर गुन्हा नोंद

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना वर्ष २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. किशोर वाघ यांच्या विविध शहरांत असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. 

महंत श्री मंडलेश्‍वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते !

महंत श्री मंडलेश्‍वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांची हिंदु महासभेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या महासभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

भारतातून हज यात्रेला जाणार्‍यांची ओळखही हिंदू म्हणून होते ! – योगी आदित्यनाथ

संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.

मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय असल्याने ते कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत ! – खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. त्याला संजय राऊत यांनी वरील शब्दांत प्रत्युत्तर दिले.

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी कारवाई न झाल्यास सभागृह चालू देणार नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, अन्यथा आम्ही या सूत्रावर तोंड न उघडणार्‍या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, तसेच सभागृह चालू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी पुणे ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्‍या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.

मशिदीमध्ये अजान देण्यास अनुमती नाकारणार्‍या इमामाचा सहकार्‍याकडून शिरच्छेद !

स्वतःच्या धर्मबांधवाचा शिरच्छेद करणारे धर्मांध हे हिंदूंविषयी कधीतरी सहनशीलता दाखवतील का ?

रूपी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर ! – सुधीर पंडित, रूपी बँक प्रशासक

रूपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी सहकार विभागाच्या वतीने विलिनीकरणाचा संयुक्त फेर प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी दिला आहे.