अमरावती येथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली !
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे.
नागपूर येथे पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमात १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ !
रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी अल्प करण्यासाठी शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यांपैकी ५ ठिकाणी वाहनचालकांची ‘रॅपिड अँटीजेन कोविड’ चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सोलापूर जिल्ह्यात १६ दिवसांत १५ सहस्र कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण
एप्रिलमधील १६ दिवसांत कोरोनाच्या दीड लाख चाचण्या करण्यात आल्या असून १५ सहस्र १३८ जण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत, तर २६७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या लाटेहून या लाटेचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे आधुनिक वैद्यांचे म्हणणे आहे.
(म्हणे) ‘अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी !’
भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशानी मायदेशी बोलावून त्यांना पोसावे !
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या साहाय्याने कोरोना रुग्णांसाठी २०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार !
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भक्त निवास येथील कोरोना केंद्रामध्ये २०० ऑक्सिजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे ऑक्सिजन बेड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
पुण्यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !
पुण्यातील जाधव कुटुंबातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कुटुंबातील सर्वांना संसर्ग होऊन केवळ १५ दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव पोटनिवडणुकीत केवळ ५६ टक्के मतदान !
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
सांगली महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयांत नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.
दळणवळण बंदीत ब्राह्मण पुरोहितांना नित्य पूजा-कर्म करण्याची अनुमती द्यावी ! – परशुराम सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारचे धार्मिक विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. बहुतांश पुरोहित आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. पुरोहितांना लोकांच्या घरी जाऊन नित्य पूजा कर्म करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी श्री. विश्वजीत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.