पुणे – कोरोना विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात सर्व प्रकारचे धार्मिक विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुरोहितांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे. बहुतांश पुरोहित आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आणि राज्यशासनाने इतर घटकांप्रमाणे पुरोहितांना कोणतेही साहाय्य घोषित केले नसल्याने पुरोहितांचा चरितार्थ चालणे शक्य नाही. त्यामुळे पुरोहितांना लोकांच्या घरी जाऊन नित्य पूजा कर्म करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.