पुणे – शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ६५० रुग्णांवर उपचार चालू असून तेथील क्षमता पूर्णपणे संपली आहे. ज्या रुग्णांना गेल्या चोवीस तासात ऑक्सिजनची आवश्यकता भासलेली नाही, अशा रुग्णांचे उपचार सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात करण्यात येत आहेत. यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या वेटिंगमध्ये असणार्या रुग्णांना खाटा उपलब्ध होणार आहेत. शहरात गंभीर रुग्णांची संख्या वाढत असून येत्या काळात ऑक्सिजन सज्ज खाटांची अधिक गरज भासणार आहे. तसेच व्हेंटिलेटरची मागणी पण वाढत असून ते मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे.