सांगली, १७ एप्रिल (वार्ता.) – दळणवळण बंदीच्या काळात राज्यशासनाने विनामूल्य शिवभोजन चालू केले आहे; मात्र १५० नागरिकांनाच याचा लाभ घेता येतो. सध्या अनेक ठिकाणी काम बंद असल्याने अनेक कामगारांना शिवभोजन थाळी न मिळाल्याने परत जावे लागत आहे. तरी शिवभोजन थाळीत वाढ करून मागेल त्याला शिवभोजन मिळावे, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले. या वेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक संजय यमगर, राजेंद्र कुंभार, अतुल माने, महेश सागरे, रघुनाथ सरगर उपस्थित होते.