खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती का स्थापन करावी लागत आहे.?

गोवा शालांत मंडळाच्या परीक्षा प्रत्यक्ष घेऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांची म्हापसा येथे निदर्शने

परीक्षा पुढे ढकलण्याविषयी आमदार रोहन खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले पत्र

राज्यात ‘प्लाझ्मा दान’ मोहिमेला अल्प प्रतिसाद

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ‘प्लाझ्मा’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार्‍या प्रत्येकाला इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.

पर्यटक टॅक्सीचालकांना पणजी येथील आझाद मैदानात आंदोलन चालू ठेवण्याची अनुमती शासनाने नाकारल्याने तणावाचे वातावरण

पर्यटक टॅक्सी बंद ठेवून आंदोलन चालूच ठेवण्याचा आंदोलनकर्त्यांच्या निर्णय

शिरोली येथे हिंदुत्वनिष्ठांनी उभारली सामूहिक गुढी ! 

गेल्या ४ वर्षांपासून शिरोली आणि मत्तीवडे येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकारानेे सामूहिक गुढी उभारण्यात येते. तेथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सामूहिक गुढीची परंपरा चालू ठेवली.

ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी !

आता ऑक्सिजनचाही प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने सगळी रुग्णालये अडचणीत आली आहेत. यामुळे ऑक्सिजनची वाहतूक करणार्‍या टँकरची पळवापळवी चालू झाल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.

उत्तरेकडील कामगार मूळगावी परतत असल्याने रेल्वेवर अतिरिक्त भार !

महाराष्ट्र राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर परराज्यातील कामगार गावी परतत असल्याने त्याचा भार रेल्वेवर पडत आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुणे आणि मुंबई येथून एकाच दिवशी उत्तरेकडील राज्यात १३ विशेष गाड्या पाठवण्यात आल्या.

ओझर्डे (जिल्हा सातारा) येथील सैनिक सिक्कीम येथे कर्तव्यावर हुतात्मा !

सैनिक सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावत होते. बर्फाच्छादीत प्रदेशात आलेल्या वादळी वार्‍याने आणि पावसाने गंभीर घायाळ झालेले तांगडे हे रुग्णालयात उपचार चालू असतांना हुतात्मा झाले.