ऑक्सिजन वाहून नेणार्‍या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा !

राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे राज्यशासनाने अन्य राज्ये, तसेच महाराष्ट्रातील ऑक्सिजनची निर्मिती करणारी आस्थापने यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी केली आहे. सिलेंडरद्वारे आणि द्रवरूपात हा ऑक्सिजन राज्यशासनाला उपलब्ध होणार आहे.

कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील ३० बंदीवान कोरोनाबाधित !

कारागृहात सध्या १ सहस्र ९२२ बंदीवान आहेत. कोरोनाबाधितांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली.

किराणा माल, भाज्या, बेकरी आदी दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी ठेवावीत !

राज्यात कोरोनाविषयीचे निर्बंध कडक करूनही नागरिक किराणा माल, भाज्या आणि अन्य साहित्य यांच्या खरेदीच्या नावाखाली रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे बाहेर गर्दी होत आहे. त्यामुळे आता किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

ठाणे येथे अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत !

अमली पदार्थ विकणारी टोळी हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या एल्.बी.टी कार्यालयातील लाचखोर लिपिक कह्यात !

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करायला हवी !

अन्य राज्यांतून ‘ऑक्सिजन’चे टँकर आणण्यासाठी एस्.टी. चालकांचे नियोजन करणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

येत्या काळात रस्ते वाहतुकीसाठी आदर्श नियमावलीही आणली जाणार आहे. तातडीचे आवश्यकता असेल, त्या ठिकाणी ‘ऑक्सिजन’ पोचण्यासाठी ‘टँकर’ ला मोकळी जागा करून दिली जाईल, असेही या वेळी परब यांनी सांगितले.

नागपूर येथे भाजपच्या ४ आमदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन !

रेमडेसिविर इंजेक्शन आणि औषधे यांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी

पशूसंग्रहालयातील प्राण्यांना गोमांसच आवडत असल्याने गोहत्या कायदा शिथील करण्यासाठी सरकारला पत्र पाठवणार ! – कर्नाटक मृगालय प्राधिकाराचे अध्यक्ष महादेवस्वामी

गोमांस धर्मांधांनाही आवडते; म्हणून गोहत्या करण्याची अनुमती द्या, अशीही मागणी उद्या केली जाईल

कोल्हापुरात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’चा काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक !

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर प्राथमिक टप्प्यात ‘रेमडेसिविर इंजेक्शन’ रुग्णांना उपयोगी पडते. त्यामुळे याची अत्यावश्यकता अधिक आहे.