गोमांस धर्मांधांनाही आवडते; म्हणून गोहत्या करण्याची अनुमती द्या, अशीही मागणी उद्या केली जाईल, त्याचे काय ?
होसपेटे (कर्नाटक) – राज्यातील पशूसंग्रहालयातील प्राण्यांना पूर्वीप्रमाणे गोमांस देण्याविषयी विचार करण्यात येत आहे. गोेहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा शिथील करण्याविषयी सरकारला पत्र पाठवण्यात आले आहे, असे कर्नाटक मृगालय प्राधिकाराचे अध्यक्ष महादेवस्वामी यांनी सांगितले. कमलापूर जवळ असलेल्या अटलबिहारी वाजपेयी प्राणी संग्रहालयाला भेट देतांना ते बोलत होते.
महादेवस्वामी म्हणाले की, प्राण्यांना गायीचे मांसच अधिक आवडते. काही ठिकाणी प्राण्यांनी कोंबडीच्या मांसाशी जुळवून घेतले आहे; परंतु काही ठिकाणी त्यांनी जुळवून घेतले नाही. लवकरच याविषयी बैठक घेऊन सरकारला पुन्हा निवेदन देण्यात येईल. यासाठी ३ वर्षांहून मोठ्या असलेल्या गायी पशूसंग्रहालयाला देऊ शकतो. निविदा मागवून गोमांसाचा पुरवठा करण्याची व्यवस्था करू शकतो.