मुंबई – अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्रशासनाकडून अनुमती देण्यात आली आहे; मात्र ऐनवेळी चालक उपलब्ध न झाल्यास ‘टँकर’ आणणे अडचणीचे होईल. त्यामुळे अन्य राज्यांतून ‘ऑक्सिजन’चे ‘टँकर’ आणण्यासाठी एस्.टी. चालकांचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी २० एप्रिल या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. येत्या काळात रस्ते वाहतुकीसाठी आदर्श नियमावलीही आणली जाणार आहे. तातडीचे आवश्यकता असेल, त्या ठिकाणी ‘ऑक्सिजन’ पोचण्यासाठी ‘टँकर’ ला मोकळी जागा करून दिली जाईल, असेही या वेळी परब यांनी सांगितले.