‘आमचे कर्तव्य नाही’ असे तुम्ही म्हणू शकत नाही !- देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

देहलीतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यामुळे देहली उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना फटकारले. केंद्र सरकारने हे आपले दायित्व नसल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने ‘हे केंद्र आणि राज्य सरकार या दोघांचे दायित्व आहे.

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तरदायी !’ – असदुद्दीन ओवैसी

रमझानच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी केली जाते, मशिदीत जाऊन नमाजपठण केले जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही का ? कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सरकारला उत्तरदायी ठरवतांना ओवैसी यांनी स्वतःच्या धर्मबांधवांना सुनावण्याचेही धारिष्ट्य दाखवावे !

मशिदींवरील अवैध भोंग्यांचा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता नसून हिंदूंना हुसकावून लावणारा ‘लॅण्ड जिहाद’ ! – संतोष पाचलग, हिंदुत्वनिष्ठ

अनधिकृत भोंगे हा प्रश्‍न केवळ ध्वनीप्रदूषणापुरता मर्यादित नसून हिंदूंना हुसकावून लावणारा नियोजित जिहाद आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकावरून दिली जाणारी अजान हा एक प्रकारे ‘लॅण्ड जिहाद’ आहे.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घ्यायचे !

अकोला येथील पोलीस निरीक्षक बी.आर्. घाडगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे खळबळजनक माहिती

परदेशात प्रसारमाध्यमांवर वाईट चित्र रंगवणे, हे भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे मोठे षड्यंत्र असू शकते ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

परदेशात प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवर भारताचे वाईट चित्र रंगवले जात आहे. त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्य यांवर वाईट प्रभाव पडतो. भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षड्यंत्रही असू शकते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २७ एप्रिल या दिवशी केले आहे. 

लव्ह जिहादमुळे कन्नड अभिनेत्रीच्या संगनमताने तिच्या भावाची धर्मांध प्रियकराकडून हत्या !

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांंना मुंबई पोलिसांकडून समन्स

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला असून २८ एप्रिल या दिवशी सायबर पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.