मुंबई – ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला असून २८ एप्रिल या दिवशी सायबर पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी असतांना राज्यातील पोलिसांच्या स्थानांतरामध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या प्रकरणी त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक जैस्वाल यांच्याकडे अहवाल सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी काही राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा रेकॉर्डही सादर केला होता. यांतील काही फोन त्यांनी अवैधपणे ‘टॅपिंग’ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सध्या रश्मी शुक्ला या केंद्रशासनाच्या अंतर्गत सेवेत रूजू आहेत.