कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विद्युत् दाहिनीत काम करणारे कर्मचारी दीड वर्ष घराबाहेर झोपत आहेत !

सोलापूर – येथील मृतदेहांना विद्युत् दाहिनीत घालणारे कर्मचारी २०२० पासून घराबाहेर झोपत आहेत. मुले आणि कुटुंबीय यांना काही होऊ नये, त्यामुळे ते ही काळजी घेत आहेत.


बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरिअल कॅन्सर रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन संपल्यामुळे २५ एप्रिलच्या रात्री २ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन संपल्यामुळे मध्यरात्री रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे, तर ऑक्सिजनमुळे रुग्णांचा मृत्यू झाला नाही, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने रुग्णालयात आले असता रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती तहसीलदारांना दिली नाही. त्यामुळे तहसीलदारांनीरुग्णालयाला पत्र पाठवून माहिती घेणार असल्याचे सांगितले.


राज्य सरकारांकडून कोरोना मृतांची संख्या अल्प दाखवण्यात येत असल्याचा तज्ञांचा दावा

जर हे खरे असेल, तर राज्य सरकार त्यांचे अपयश झाकण्याचाच प्रयत्न करत आहेत. लोकांनी आतातरी सरकार जिवंतपणी साहाय्य करणार नाही आणि मृत्यूनंतरही राजकारण चालू ठेवणार, हे लक्षात घेऊन धर्माधिष्ठितांचे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी कृतीशील व्हावे !

नवी देहली – भारतातील कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍यांच्या संख्येविषयी तज्ञांकडून शंका उपस्थित केली जात आहे. सरकारकडून मृतांच्या संख्येपेक्षा अल्प संख्या सांगितली जात आहे, असा दावा केला जात आहे. काही समीक्षकांच्या मते खरी संख्या लपवण्यासाठी राज्य सरकारांवर केंद्राचा दबाव आहे. अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाचे महामारी तज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, आम्ही जेवढे मॉडेल बनवले आहेत त्याच्या आधारे आम्ही निश्‍चितपणे सांगू शकतो की, मृतांची जेवढी संख्या दाखवली जात आहे त्यापेक्षा २ ते ५ पट अधिक मृत्यू झाले आहेत. काही मासांपूर्वी भारताची स्थिती चांगली होती.

१. कर्णावतीमध्ये एका स्मशानभूमीत २४ घंटे चिता जळत आहेत. तेथे काम करणारे सुरेशभाई यांनी सांगितले की, आम्ही मृतांच्या नातेवाइकांना ज्या पेपर स्लिप देतो, त्यात मृत्यूचे कारण लिहीत नाही. अधिकार्‍यांनीच तसे निर्देश दिले आहेत.

२. वायूगळती दुर्घटना अनुभवलेल्या भोपाळचे लोक सांगतात की, त्या दुर्घटनेनंतर प्रथमच स्मशानांमध्ये गर्दी दिसत आहे. एप्रिलच्या मध्यात अधिकार्‍यांनी कोरोनाचे मृत्यू ४१ सांगितले; मात्र, कब्रस्तान आणि स्मशानभूमी यांच्या सर्व्हेक्षणात या काळात १ सहस्रांहून अधिक अंत्यसंस्कार कोविड प्रोटोकॉलनुसार झाल्याचे दिसून आले. हीच स्थिती गुजरात आणि उत्तरप्रदेशातील आहे. गुजरातमध्ये या काळात सरासरी ६१० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत होते.

३. काँग्रेसशासित राज्यात अधिकार्‍यांनी १५ ते २१ एप्रिल या काळात कोरोनामुळे १०५ जणांचे मृत्यू झाल्याचे सांगितले. राज्य सरकारने दुर्गमध्ये मृतांची संख्या निम्मीच सांगितली. यावर आरोग्यमंत्री टी.एस्. सिंहदेव म्हणाले की, आम्ही पारदर्शकता ठेवली आहे.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]