लव्ह जिहादमुळे कन्नड अभिनेत्रीच्या संगनमताने तिच्या भावाची धर्मांध प्रियकराकडून हत्या !

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

शनाया काटवे

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री शनाया काटवे हिचे नियाझ अहमद कटिगार यांच्याशी प्रेमसंबंध होते. तिचा भाऊ राकेश काटवे याचा त्याला विरोध होता. त्याचा काटा काढण्यासाठी शनायाच्या सांगण्यावरून नियाझ याने साथीदारांच्या साहाय्याने राकेशची हत्या केली. पोलिसांनी शनाया, नियाझ, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरणीवाले यांना अटक केली. त्यांनी राकेशची निर्घृणपणे हत्या करून मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले.

देवरगुडीहल वनक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत त्याचे डोके आढळले, तर शरिराचा इतर भाग हुब्बळ्ळीतील परिसरात आढळला. राकेशची हत्या झाली, तेव्हा शनाया तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. ही हत्या तिच्या हुब्बळ्ळीच्या घरात झाली.