संभाजीनगर येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला !

येथील महापालिकेच्या ‘मेल्ट्रॉन कोविड केंद्रा’मधून ४८ रेमडेसिविर इंजेक्शनचा खोका हरवला आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या प्रकरणी ३ कर्मचार्‍यांना ‘हातात नोटीस पडताच उत्तर द्या’, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस २७ एप्रिल या दिवशी बजावली आहे.

धार येथील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरतांना झालेल्या स्फोटात ६ जण घायाळ

येथील पीथमपूर सेक्टर ३ मधील रानीका इंडस्ट्री लिमिटेडच्या प्लांटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरतांना झालेल्या स्फोटात ६ कर्मचारी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

गडचिरोली येथे चकमकीत पोलिसांकडून २ नक्षलवादी ठार

जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा जंगल परिसरात २८ एप्रिलच्या पहाटे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू !

मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर २७ एप्रिलच्या मध्यरात्री ३ वाजून ४० मिनिटांनी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

 भारतातील कोविड चाचणी विश्‍वासार्ह नाही ! – ऑस्ट्रेलिया

 भारतात होणार्‍या कोरोना चाचणीत त्रुटी असावी अथवा विश्‍वास करण्याजोगी नसावी, असे पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप केले असून त्याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप केले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे आणि औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्‍चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत.

नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

केंद्रशासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लसीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा ! – महंत संतदास महाराज, भिलवाडा

कुंभमध्ये अनेक संन्यासी असूनही त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो. देश, धर्म आणि समाज यांच्या प्रती स्वतःचे दायित्व ते विसरत आहेत. गृहस्थीही स्वतःचे दायित्व विसरून पश्‍चिमी संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी अग्नीसुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेण्याचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश !

रुग्णालयांमध्ये शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

जगभर थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून बाणूरगड मात्र मुक्त !

शासनाच्या नियमांचे पालन केल्यास स्वतःचे पर्यायाने गावाचे रक्षण होऊ शकते, याचा आदर्श बाणूरगड गावातील लोकांनी सर्वांसमोर ठेवला आहे.