जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांना पितृशोक

सांगली – जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांचे वडील दत्तात्रय बिडकर (वय ८१ वर्षे) यांचे २ मे या दिवशी विटा येथील रुग्णालयात निधन झाले. दत्तात्रय बिडकर हे नामवंत मूर्तीकार होते. त्यांच्या पश्‍चात मुलगी, जावई, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.