लोकसभेचे मतदान चालू असतांनाच ‘शहरात बाँबस्फोट घडवणार’, असा नियंत्रण कक्षाला खोटा दूरभाष !

संबंधितावर कठोर कारवाई केल्यास असा गैरप्रकार करण्यास कुणी धजावणार नाही !

मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे शिरूरमधील (पुणे) उमेदवारावर गुन्हा नोंद !

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बंदी असतांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा परिसरातील ‘सारथी प्रसारक मंडळ ज्ञानदीप इंग्लीश स्कूल’ येथील मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले.

पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !

केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : घाटकोपर येथे होर्डिंगसाठी झाडांना दिले विषारी इंजेक्शन !; वादळामुळे नवी मुंबईत ३० हून अधिक झाडे उन्मळून पडली !…

मुंबईतील घाटकोपर परिसरात मोठे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग लावतांना आजूबाजूच्या झाडांना विषारी इंजेक्शन देऊन जाळण्यात आल्याचे समजते.

बंद पडत चाललेल्या मातृभाषेतील प्राथमिक शाळा पुनश्च फुलवण्यास ‘विद्याभारती गोवा’ संघटना सिद्ध ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

मातृभाषेतील शाळांना अवकळा आल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरील अभिप्राय !

(म्हणे) ‘श्री लईराईदेवीच्या जत्रेतील पवित्र होमकुंडामुळे पर्यावरणाची हानी होते !’ – स्वीडेल रोड्रीगीज

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ख्रिस्ती युवतीविरुद्ध तक्रार करणार्‍या श्री लईराई देवस्थान समितीचे अभिनंदन ! असे जागरूक हिंदू, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे !

अमरावती महापालिकेतील ७०० कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

अमरावती महापालिकेतील ७०० कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार आंदोलन करूनही आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

सर्वाेच्च न्यायालयाकडून कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या वेळी या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलखा यांना ४ वर्षांनंतर न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.

थोरले नानासाहेब पेशवे यांचे कर्तृत्व दुर्लक्षित ! – डॉ. उदय कुलकर्णी, इतिहास अभ्यासक

थोरले नानासाहेब पेशवे यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक मोहिमा केल्या आहेत. त्यांच्या काळात मराठेशाही उच्च पदावर पोचली.