कॅनडातील श्रीराम मंदिराची तोडफोड

कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला तेथील सरकारचे अभय आहे. याकडे आता भारत सरकारला विशेष लक्ष देऊन अशा घटना रोखण्यासाठी आणि खलिस्तानवाद्यांवर लगाम लावण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील !

समुद्राची पातळी वाढू लागल्याने मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आदी शहरांना मोठा धोका !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !

सह्याद्री प्रतिष्ठानने दाभोळ बंदरातील तोफांच्या संवर्धनाची केली मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !

यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !

यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे.त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीचा खारटपणा वाढणार !

म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याची क्षारता वाढेल. त्यामुळे पश्चिम घाट आणि अन्य वनांतील वन्यजीव यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हादईचे पाणी वळवल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोत सुकणार आहेत.

योगऋषी रामदेवबाबा यांचे मिरामार समुद्रकिनार्‍यावर नि:शुल्क योग महाशिबिर !

‘पतंजलि योग पीठ’ हे जगातील सर्वांत मोठे योगपीठ आहे. योगऋषी रामदेवबाबा जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये, प्राचीन परंपरेची शिकवण स्वत:च्या आचरणातून सर्वांना शिकवत आहेत.

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

कर्नाटकला प्रकल्पांसाठी संबंधित अनुज्ञप्त्या मिळू नयेत, यासाठी प्रयत्न करणार ! – महाधिवक्ता देविदास पांगम

कर्नाटक यापुढे म्हादईचे पाणी वळवू शकणार नाही आणि गोव्यासाठी ही जमेची बाजू आहे. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी गोवा सरकार पुन्हा न्यायालयात दाद मागू शकणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजना घोषित करण्‍यात आली आहे.

प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याप्रकरणी मुंबईतील माजी नगरसेवकाला अटक !

लांडगे यांना अटकेच्‍या निषेधार्थ त्‍यांच्‍या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्‍याबाहेर निदर्शने केली.