(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो

स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्‍या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?

तुर्कीयेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये पुन्‍हा उपस्‍थित केले काश्‍मीरचे सूत्र !

तुर्कीयेचे राष्‍ट्रपती रेसेप तय्‍यिप एर्दोगान यांनी संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या महासभेमध्‍ये पुन्‍हा एकदा काश्‍मीरचे सूत्र उपस्‍थित केले. ते म्‍हणाले, ‘भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्‍मीरमध्‍ये स्‍थायी आणि न्‍यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.

(म्‍हणे) ‘कॅनडातील हिंदूंनी त्‍वरित देश सोडून निघून जावे !’

बंदी घालण्‍यात आलेली खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्‍या हिंदूंना त्‍वरित कॅनडा सोडून जाण्‍याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे.

जस्टिन ट्रुडो यांची कृती वेडगळपणाची असल्याने अमेरिकेने त्यांच्या बाजूने उभे राहू नये ! – अमेरिकेतील अभ्यासक

भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर अमेरिकेतील हडसन इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल रुबिन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या वेळी म्हटले की, जस्टिन ट्रुडो अशा लोकांच्या सल्ल्याने हे सर्व करत आहेत, ज्यांना खलिस्तानी चळवळ ही त्यांच्या लाभाची वाटते.

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.

पृथ्वीमुळे चंद्रावर पाणी निर्माण होत आहे !

पौर्णिमा आणि अमावास्या यांच्या काळात चंद्रामुळे पृथ्वीवरील वातावरणात सूक्ष्मस्तरावर काही पालट होत असतात. त्याचा परिणाम मनुष्याच्या मनावरही होतो, हे ऋषी-मुनी यांनी सांगितलेले आहे. आता यावरही विज्ञानवाद्यांनी सखोल संशोधन करावे !

भारताने अफगाणिनस्तानमध्ये पाठवले ५० सहस्र मेट्रिक टन धान्य आणि २०० टन औषधे !

भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?

मंगळ ग्रहावरील अमेरिकेच्‍या यानाद्वारे प्राणवायूची निर्मिती !

या उपकरणाने आतापर्यंत १६ वेळा प्राणवायूची निर्मिती केली आहे. नासाच्‍या म्‍हणण्‍यानुसार हे उपकरण प्रत्‍येक घंट्याला १२ ग्रॅम प्राणवायू निर्माण करू शकतो आणि याची शुद्धता ९८ टक्‍के इतकी आहे.

(म्हणे) ‘कॅनडातील भारताचा दूतावास बंद करा !’ – कॅनडातील खलिस्तान्यांची मागणी

अशा मागण्यांना कुणी भीक घालेल का ? कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या खलिस्तान्यांवर कारवाई करून ‘ते याविषयी गंभीर आहेत’, हे दाखवून द्यावे !

अमेरिकी प्रसारमाध्यमांकडून भारताची प्रशंसा !

भारतातील ‘जी २०’ परिषदेच्या वृत्ताला जगभरातील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. परिषदेत कूटनीतीचा वापर करून सूत्रे हाताळणार्‍या भारताची अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे.