खलिस्तानी कॅनडामध्ये भारताविरुद्ध मोर्चा काढणार !

यातून लक्षात येते की, कॅनडातील सरकार खलिस्तान्यांना अद्यापही मोकळीकच देत आहे. भारताने आता कॅनडावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा !

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

कॅनडामध्ये खलिस्तानी आणि मणीपुरी ख्रिस्ती कुकी यांच्यात युती झाल्याची शंका !

भारतविरोधी कारवायांसाठी अल्पसंख्य समाज एकत्र येत असेल, तर भारतातील सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे, हेच यातून लक्षात येते !

कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये. 

कॅनडामध्ये मानव तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि आतंकवाद यांचे मिश्रण !

कॅनडाने आतंकवादी आणि आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी लोकांना साथ दिली आहे. कॅनडामध्ये अशा लोकांना स्थान मिळाले आहे.

(म्हणे) ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी आधी आरोप मागे घेऊन त्यांच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि मगच संबंधांविषयी बोलावे !

हवामान पालटाच्या विरोधात विकसित देश निष्क्रीय ! – भारताची रोखठोक भूमिका

आतापर्यंत विकसित देशांना त्यांच्या गैरकृत्यांवर विचारणारे कुणी नव्हते, किंबहुना तसे करण्यास अन्य कोणताही देश धजावत नसे. भारताच्या अशा भूमिकेमुळे विकसित देशांना चपराक बसत आहे !

अमेरिकेच्या संसदेत श्री श्री रविशंकर आणि आचार्य लोकेश मुनी यांच्या शांततेच्या कार्याचे कौतुक !

श्री श्री रविशंकर गेल्या ४० वर्षांपासून ध्यान आणि योग यांच्या बळावर जगातील लोकांना आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. जगातील एकतरी इस्लामी धर्मगुरु असे कार्य करतात का ?

कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्‍यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !

कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !

कॅनडामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचाराचे समर्थन केले जात आहे !

स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.