कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्‍यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !

तक्रारीनंतर सरकारने फलक काढण्याचा आदेश देऊनही कारवाई नाही !

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या झाल्यानंतरही ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरुनानक गुरुद्वारामध्ये भारतीय दूतावासातील ३ अधिकार्‍यांच्या हत्या करण्यासाठी चिथावणी देणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर या अधिकार्‍यांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. ‘हे अधिकारी निज्जर याच्या हत्येत सहभागी होते’, असा दावा करण्यात आला आहे. या गुरुद्वाराबाहेरच निज्जर याची हत्या करण्यात आली होती.

फलक हटवण्याविषयी तक्रार करण्यात आल्यानंतर सरकारने ते हटवण्याचा आदेशही दिला होता; मात्र एका प्रवेशद्वाराजवळील फलक हटवला, तरी दुसर्‍या प्रवेशद्वाराजवळ हे फलक अद्यापही हटवण्यात आलेले नाहीत. कॅनडाकडून निज्जर याच्या हत्येचा भारतावर आरोप करत भारताचे अधिकारी पवन रॉय यांना कॅनडा सोडून जाण्यास सांगितले होते. यावरून दोन्ही देशांमध्ये वाद चालू आहे.

संपादकीय भूमिका 

  • कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !

  • कॅनडामध्ये राज्य तेथील सरकारचे कि खलिस्तान्यांचे ?