ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये मणीपूरमधील ख्रिस्ती कुकी समुदाय आणि खलिस्तानी आतंकवादी यांच्यात युती झाल्याचे वृत्त आहे. कॅनडातील सरे शहरातील ज्या गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी आतंकवादी निज्जर याची हत्या झाली, त्याच गुरुद्वारामध्ये कुकी समुदायाची संघटना ‘नॉर्थ अमेरिकन मणीपूर ट्रायबल असोसिएशन’च्या एका नेत्याने भारताच्या विरोधात गरळओक केल्याचा व्हिडिओ त्यानेच सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला होता; मात्र भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद वाढल्यावर त्याने हा व्हिडिओ माध्यमांतून काढून टाकला आहे. हा व्हिडिओ याच वर्षी ७ ऑगस्ट या दिवशी प्रसारित करण्यात आला होता.
Manipur Tribal Leader’s Canada Speech Raises Khalistani Links Allegations https://t.co/q5ZKgmjPzn pic.twitter.com/8k4EK89tHl
— NDTV (@ndtv) September 29, 2023
या संघटनेचा प्रमुख लि एन् गांगते याने यात म्हटले होते की, मणीपूरमध्ये ३ मे पासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत (७ ऑगस्टपर्यंत) १२० हून अधिक लोक ठार झाले आहेत, तर ७ सहस्र घरांत लूटमार करून त्यांना आगी लावण्यात आल्या. शेकडो चर्च जाळण्यात आले, तर २०० गावांना नष्ट करण्यात आले. प्रशासन या संदर्भात काहीच करत नसून पोलीस दंगलखोरांना प्रोत्सहित करत आहे. तेथून कुकी समाजाच्या लोकांना पळवून लावण्यात आले आहे. भारतात आता अल्पसंख्यांक, मग ते मुसलमान, शीख किंवा ख्रिस्ती असो, सुरक्षित नाहीत. या संदर्भात आम्हाला कॅनडा सरकारने साहाय्य करावे, असे आवाहन गांगते याने केले होते.
Why Manipur Tribal Leader’s Speech In Canada Has Raised Khalistani Links Allegationshttps://t.co/o3q04LTlvx
— TIMES NOW (@TimesNow) September 30, 2023
गुप्तचर यंत्रणांचे लक्ष !
भारतीय गुप्तचर यंत्रणा खलिस्तानी आणि ‘नॉर्थ अमेरिकन मणीपूर ट्रायबल असोसिएशन’ यांच्यात गुरुद्वारात झालेल्या बैठकीवरून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. तसेच मणीपूर सरकारही याकडे लक्ष ठेवून आहे.
संपादकीय भूमिकाभारतविरोधी कारवायांसाठी अल्पसंख्य समाज एकत्र येत असेल, तर भारतातील सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे, हेच यातून लक्षात येते ! |