भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

(म्हणे) ‘भारताच्या राजदूतांची हकालपट्टी करा, रा.स्व संघावर बंदी घाला !’ – कॅनडातील मुसलमान संघटना

अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !

कॅनडामध्ये वर्षभरात भारतविरोधी १५ घटना घडूनही एकालाही अटक नाही !

यातून ट्रुडो सरकारची कार्यक्षमता आणि भारतद्वेष लक्षात येतो ! असे सरकार भारतावर आरोप करून जगात हास्यास्पदच ठरत आहे !

(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’

कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !

लिबियामध्‍ये ४० सहस्र लोकांच्‍या मृत्‍यूची शक्‍यता !

लिबियामध्‍ये झालेल्‍या मुसळधार पावसामुळे डर्ना शहरातील २ धरणे फुटून आलेल्‍या पुरामुळे आतापर्यंत ११ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे

कॅनडाकडून भारतावर हत्येचा आरोप करत उच्चाधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ बंद !

लंडन येथील ऐतिहासिक ‘इंडिया क्लब’ १७ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला. हा क्लब भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होता. या ठिकाणी अनेक स्वातंत्र्यसैनिकांसह क्रांतीकारकही राहिले होते.

ब्रिटनचे बर्मिंघम शहर दिवाळखोर होण्यामागे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक !

संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !

कॅनडाने भारतासमवेतच्या मुक्त व्यापारावरील चर्चा पुढे ढकलली !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भारतद्वेषी आणि खलिस्तानप्रेमी मानसिकता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत कॅनडाकडून कोणतीही अपेक्षा करणे व्यर्थच म्हणावे लागेल !

जर माझ्‍या सरकारची धोरणे राबवली असती, तर पाकिस्‍तान ‘जी-२०’ देशाच्‍या बैठकीत असता !

पाकचे माजी पंतप्रधान शरीफ यांचा दावा !