ब्रिटनचे बर्मिंघम शहर दिवाळखोर होण्यामागे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक !

स्थानिक ब्रिटीश नागरिकांचा दावा !

लंडन (ब्रिटन) – काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील बर्मिंघम शहर दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले. या संदर्भात महानगरपालिकेचा एक व्हिडिओ येथे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. त्यात ‘शहर दिवाळखोर होण्यामागे येथे रहाणारे पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक कारणीभूत आहेत’, असे स्थानिक ब्रिटीश नागरिकांकडून म्हटले जात आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी येथे आल्यामुळे येथील बेरोजगारात वाढ झाली, असे लोकांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये बर्मिंघम येथेच पाकिस्तान्यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे.

वर्ष २०२१ च्या आकडेवारीनुसार बर्मिंघम शहराच्या लोकसंख्येत ३ लाख ५५ सहस्र ३८४ आशियाई लोक आहेत. त्यात ६६ सहस्र ५१९ भारतीय, तर १ लाख ९५ सहस्र १०२ पाकिस्तानी नागरिक आहेत, तसेच ४८ सहस्र २३२ बांगलादेशी आहेत. हे पाकिस्तानी सर्वाधिक पाकव्याप्त काश्मीर आणि पाकच्या पंजाब प्रांतातील आहेत. पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांची शैक्षणिक पात्रता शून्य आहे. यांतील ४७ सहस्र लोकांना इंग्रजीही बोलता येथे नाही. पाकिस्तान्यांमध्ये गरीबीचे प्रमाण ३७ टक्के आहे.

संपादकीय भूमिका

संपूर्ण पाकिस्तानच आता आर्थिक दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यातूनच पाकिस्तान्यांची पात्रता काय आहे ?, हे जगाला लक्षात आले असेलच !