जर माझ्‍या सरकारची धोरणे राबवली असती, तर पाकिस्‍तान ‘जी-२०’ देशाच्‍या बैठकीत असता !

पाकचे माजी पंतप्रधान शरीफ यांचा दावा !

पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

लंडन (ब्रिटन) – जर वर्ष २०१७ मधील आमच्‍या सरकारची धोरणे कायम ठेवण्‍यात आली असती, तर पाकिस्‍तान जी-२० देशांच्‍या बैठकीत उपस्‍थित असता, असे विधान ब्रिटनमध्‍ये निर्वासित म्‍हणून रहात असलेले पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले. शरीफ यांना भारतात आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘जी-२०’ परिषदेला पाकिस्‍तानला आमंत्रित न करण्‍यावरून पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्‍यावर त्‍यांनी वरील उत्तर दिले.