महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी

भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध

कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.

यवतमाळ येथील ‘महिला उत्थान मंडळा’च्या वतीने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना निवेदन !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच ते ८ वर्षांपासून कारागृहात असून विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

दळणवळण बंदीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद ! – केंद्र  सरकारची माहिती

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

पुणे येथील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय

शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

कोरोनाचे संकट असतांना १ मार्चपासून आमदारांचे वेतन पूर्ववत् !

आमदारांचा निधी ४ कोटी रुपये केला ! – अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, राज्य आर्थिक संकटात असतांना लोकप्रतिनिधींचे वेतन वाढवणे कितपत योग्य ?

जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गोवा मनोरंजन संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प आता जनतेसाठी खुला

कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे.

कळंगुट येथे २ निरनिराळ्या छाप्यांमध्ये एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

कळंगुट पोलिसांनी ९ मार्च या दिवशी २ निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले पवित्र (शाही) स्नान भावपूर्ण वातावरणात पार पडले.