गोवा मनोरंजन संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आलेला मल्टिप्लेक्स प्रकल्प आता जनतेसाठी खुला

पणजी (प्र.प.) – कोविडमुळे जवळजवळ १ वर्ष बंद ठेवण्यात आलेला गोवा मनोरंजन संस्थेचा मल्टिप्लेक्स प्रकल्प जनतेसाठी १ मार्च २०२१ या दिवशी पुन्हा चालू करण्यात आला आहे. मल्टिप्लेक्समध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी गोवा मनोरजंन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, गोवा राज्याचे सचिव, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तारीक थॉमस आणि मुख्य व्यवस्थापिका मृणाल वाळके उपस्थित होते. या मल्टिप्लेक्समधील चित्रपटागृहांतून जगभरातील चांगले चित्रपट दाखवले जातात. या प्रकल्पामध्ये एकूण ४ वातानुकुलीन चित्रपटगृहे असून ती आरामदायी खुर्च्या आणि डॉल्बी अ‍ॅटम्स ही ध्वनीयंत्रणा बसवून सुसज्ज केली आहेत. याखेरीज या प्रकल्पात एक उपाहारगृह आहे. वर्ष २००४ मध्ये गोवा शासनाने गोवा मनोरंजन संस्थेची स्थापना केली. गोवा राज्यातील करमणूक कार्यक्रमांची ती पहिली एजन्सी आहे.