चुलत भाऊ आणि बहीण यांचा विवाह अवैधच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

लुधियानातील एका २१ वर्षांच्या मुलावर अपहरण आणि अत्याचार यांचा गुन्हा नोंद असून त्याने या प्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपी तिचा चुलतभाऊ आहे.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.

गोव्यात कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटक आल्यामुळे गोमंतकियांना धोका !

कळंगुट समुद्रकिनार्‍यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !

घनकचर्‍यावर ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला प्रकल्प मालवण येथे कार्यान्वित

 ‘बायोमायनिंग’ प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो.

आयी आणि मांगेली गावांच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर आज होणार निर्णय

ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

गोवा पोलीस पुरो(अधो)गामी प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षा पुरवणार

फेसबूक ‘पोस्ट’वरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : पोलीस महासंचालक म्हणाले, ‘‘या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्राध्यापिका शिल्पा सिंह यांना सुरक्षाही पुरवली जाणार आहे.

दोडामार्ग आय.टी.आय. येथील कोरोना उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालयात हालवले

तातडीच्या उपचाराची आवश्यकता असल्यास सावंतवाडी किंवा ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात भरती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक

७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ! – सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष, मालवण

मुंबईसह देहली येथे मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत.

कॅसिनो चालू करण्याची अनुज्ञप्ती त्वरित मागे घ्या !

शासनाने तरंगते कॅसिनो बंद न केल्यास कॅसिनोंच्या कार्यालयांसमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील