वस्त्यांची जातीवाचक नावे पालटण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

राज्यातील वाड्या, वस्त्या आदींना असणारी जातीवाचक नावे पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २ डिसेंबरच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. यामुळे आता कुंभारवाडा, तेलीआळी, सुतारवाडी आदी जातीवाचक नावे पालटण्यात येणार आहेत.

धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी

धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी झाले आहेत. पटेल हे माजी शालेय शिक्षणमंत्री आहेत. निवडणुकीत ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते.

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली !

मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर या दिवशी शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता

भिवंडी येथे गायींची वाहतूक करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्‍या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे.

अल्पवयीन हिंदु युवतीची छेड काढल्याच्या प्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद  !

येथील १७ वर्षीय हिंदु युवतीची छेड काढल्याप्रकरणी जय उपाख्य अलीयास याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यात हवाला व्यवहारावर गुन्हे शाखेची कारवाई !

अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.

भाजपची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगावात

भारतीय जनता पक्षाची विशेष राज्य कार्यकारिणी सभा ५ डिसेंबर या दिवशी बेळगाव शहरात होत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम सूडबुद्धीने ! – माजी मंत्री राम शिंदे, भाजप

सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचे काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.

राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गोव्यातील आर्चबिशपांचाही विरोध

अनेक प्रकल्पांना विरोध करतांना त्यात चर्चप्रणित संघटनांचा सहभाग असतो आणि ख्रिस्ती समाजाची संख्याही अधिक असते. याचे कारण यातून लक्षात येते. हिंदूंनी यातून शिकावे !

विकिपीडियाकडून भारताच्या मानचित्रातील ‘अक्साई चीन’ला चीनमध्ये दाखवले !

‘विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील भारताच्या मानचित्रामध्ये अक्साई चीनला चीनच्या मानचित्रात दाखवल्याने भारत सरकारने आक्षेप घेत हे मानचित्र हटवण्याचा आदेश दिला आहे.