भिवंडी येथे गायींची वाहतूक करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

गोवंश हत्याबंदी कायद्याची एैशीतैशी !

ठाणे, ३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही भिवंडी येथील नदीनाका येथे चारचाकी वाहनातून धर्मांधांनी गायींची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्‍या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अब्दुल्ला मौला शेख, गुड्डू, नदीम, जमील, तसेच गाडीचा मालक अशा ५ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहनातील ३ गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे, तर पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.