उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्रालयातील ६०२ क्रमांकाच्या कक्षात बसण्यास नकार !

पवार यांच्या नकारामागे यापूर्वी हा कक्ष वापरलेल्या नेत्यांच्या संदर्भात घडलेल्या नकारात्मक घटना कारणीभूत !

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील ६०२ कक्षात बसण्यास नकार दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांसाठी असलेल्या ५०२ या कक्षात कार्यालय चालू करण्याचे ठरवले आहे.

वर्ष २०१४ मध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक व्यवहार खात्याचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी ६०२ या कक्षात त्यांचे कार्यालय चालू केलेे; पण २ वर्षांतच त्यांना भूखंड घोटाळ्याप्रकरणी मंत्रीपदाचा त्यागपत्र द्यावे लागले. भाजपचे नेते पांडुरंग फुंडकर हे कृषीमंत्री असतांना त्यांना हा कक्ष देण्यात आला होता; पण मे २०१८ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाले. त्याचवर्षी अनिल बोंडे यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांना हाच कक्ष देण्यात आला होता; पण त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या घटनांमुळे अजित पवार यांनी ६०२ या कक्षामध्ये बसण्यास नकार दिला आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी अंनिसवाले आणि पुरो(अधो)गामी यांना काय म्हणायचे आहे ?