Hamas New Chief Killed : हमासचा नवीन प्रमुखही इस्रायलकडून ठार !

इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात हमासचा प्रमुख मुहम्मद शाहीनचा खात्मा !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने हमासच्या नव्या प्रमुखालाही ठार केले. १७ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण लेबनॉनच्या रस्त्यावर हमासचा प्रमुख महंमद शाहीन बिनधास्त फिरत होता. त्या वेळी एका इस्रायली ड्रोनने त्याला ठार केले. विशेष म्हणजे युद्धविराम कराराच्या अंतर्गत इस्रायलला दक्षिण लेबनानमधून पूर्णपणे मागे हटायचे असतांना हे आक्रमण करण्यात आले. इस्रायल आणि लेबनॉनमधील आतंकवादी संघटना हिजबुल्ला यांच्यामध्ये १४ महिने चाललेले युद्ध संपवण्यासाठी करार करण्यात आला आहे.

अलीकडे लेबनानी क्षेत्रातून इस्रायली नागरिकांवर आक्रमणे झाली, त्यामागे महंमद शाहीन याचा हात असल्याचा आरोप इस्रायलने केला. शाहीन याने केलेल्या आक्रमणांना इराणचे समर्थन होते, असा दावा इस्रायली सैन्याने केला.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांना वेचून कसे ठार करायचे, हे भारताने इस्रायलकडून शिकावे आणि कृतीत आणावे !