Ceasefire in Gaza : गाझामध्ये युद्धबंदी : इस्रायल ७३५ पॅलेस्टिनी आतंकवाद्यांना सोडणार !

इस्रायल-हमास यांच्यातील चर्चा

तेल अवीव – गाझामध्ये युद्धबंदीसाठी इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये अंतिम करार झाला आहे. इस्रायलने ७३५ पॅलेस्टिनी आतंकवाद्यांना कारागृहातून सोडण्यास सहमती दर्शवली आहे. त्या बदल्यात हमास गाझामध्ये बंदिस्त असलेल्या सर्व इस्रायली ओलिसांना सोडेल.

इस्रायल-हमास करार हा १५ महिन्यांच्या युद्धानंतर झाला आहे. या युद्धात इस्रायलने गाझा पट्टीचा बराचसा भाग उद्ध्वस्त केला. ४६ सहस्रांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या कराराच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात हमास ३३ इस्रायली बंधकांना सोडेल. त्यानंतर इस्रायल त्याच्या कारागृहात बंद असलेल्या ७३५ पॅलेस्टिनींना सोडणार आहे.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने दक्षिण इस्रायलवर आक्रमण केले, ज्यामध्ये सुमारे १ सहस्र २०० लोक मारले गेले आणि २५१ लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी गटाच्या कह्यातील गाझा पट्टीवर लष्करी आक्रमणे चालू केली होती.