Indian Workers Rescued By Israel : इस्रायलने पॅलेस्टिनींच्या बंदिवासातून १० भारतीय कामगारांची केली सुटका !

तेल अविव – इस्रायली अधिकार्‍यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी लोकांच्या बंदिवासातून १० भारतीय कामगारांची सुटका करत त्यांना इस्रायलमध्ये परत आणले आहे. पॅलेस्टिनींनी या भारतियांना इस्रायलमधून वेस्ट बँकमधील अल्-जयिम गावात काम देण्याच्या बहाण्याने आणून ओलीस ठेवले आणि त्यांची सर्व पारपत्रे जप्त केली होती. ६ मार्चच्या रात्री वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईत इस्रायली अधिकार्‍यांनी सर्व ओलिसांची सुटका केली, अशी माहिती इस्रायलमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मे २०२३ मध्ये झालेल्या करारानुसार, १९५ इस्रायली कंपन्या भारतीय कामगारांना रोजगार देतात. या करारानुसार, ४२ सहस्र भारतीय कामगारांना इस्रायलमध्ये रोजगार देण्यात येणार होता. वर्ष २०२४ पासून १६ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला गेले आहेत.