
चंडीगड – पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. प्रदेशाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले, तरी मी काँग्रेसमध्येच रहाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी याविषयी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंजाबचे भवितव्य आणि पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यांविषयी तडजोड करणार नाही.
#CongressComedy | Navjot Singh Sidhu resigns as Punjab Congress chief even as Amarinder Singh heads to Delhihttps://t.co/qh32fzYyyq
— Republic (@republic) September 28, 2021
सिद्धू स्थिर व्यक्ती नाही ! – कॅप्टन अमरिंदर सिंह
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात गेल्या काही मासांपासून वाद चालू होता. त्यातूनच कॅप्टन अमरिंदर सिंह यांना त्यागपत्र द्यावे लागले होते. आता सिद्धू यांच्या त्यागपत्रावर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ट्वीट करून म्हटले की, मी तुम्हाला सांगितले होते की, सिद्धू स्थिर व्यक्ती नाही आणि पंजाब राज्यासाठी योग्य नाही.
I told you so…he is not a stable man and not fit for the border state of punjab.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 28, 2021
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !