ख्रिस्ती मिशनरी पंजाबच्या सीमेवरील भागात दलित शिखांचे बलपूर्वक धर्मांतर करत आहेत ! – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी

धर्मांतराविरोधात घरोघरी जाऊन प्रचार करणार

ईशान्य भारताला ख्रिस्तीबहुल केल्यानंतर आता पश्‍चिम भारताला ख्रिस्तीबहुल करण्याचा ख्रिस्ती मिशनरींचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक

डावीकडे ‘अकाल तख्त’चे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह

अमृतसर (पंजाब) – ख्रिस्ती धर्मप्रचारक गेल्या काही वर्षांपासून पंजाबच्या सीमेवरील भागांमध्ये शिखांचे विशेषतः दलित शिखांचे आमीष दाखवून, बुद्धीभेद करून, तसेच बलपूर्वक धर्मांतर करत आहेत, याविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे, असे वक्तव्य ‘अकाल तख्त’चे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी केले आहे. (शिखांच्या ५ तख्तांपैकी अमृतसर येथील ‘अकाल तख्त’ हे एक आहे. शिखांच्या प्रमुख प्रवक्त्यांना ‘जत्थेदार’ म्हटले जाते.) ज्ञानी हरप्रीत सिंह हे एक दलित शीख आहेत. शिखांच्या या वाढत्या धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शीख धर्माचा प्रसार करणारे घरोघरी शीख धर्माविषयीची माहिती देणार्‍या साहित्यांचे वितरण करणार आहेत. यासाठी १५० पथकांची स्थापना करण्यात आली आहे.