पंजाबमध्ये विद्यापिठांच्या वसतीगृहातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाककडून भारताच्या झालेल्या पराभवाचा परिणाम !

संगरूर (पंजाब) – ‘टी-२०’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकसमवेतच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील ‘भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वसतीगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. अशीच घटना राज्यातील खरारमधील रयत बहराट विद्यापिठातही घडली आहे. या विद्यार्थ्यांचे स्थानिक लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी रक्षण केले. ‘बिहार, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथील विद्यार्थी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये घुसले अन् त्यांना मारहाण केली’, असा दावा ‘जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटने’चे राष्ट्रीय प्रवक्ते नसीर खुहेमी यांनी केला.