सैन्याने गोळीबार करून पिटाळले
भारताकडे अद्याप ड्रोनविरोधी यंत्रणा नसल्याने पाकचे फावते आहे. भारत अद्यापही संरक्षणाच्या संदर्भात मागास आहे, असे लक्षात येते ! – संपादक
पठाणकोट (पंजाब) – पंजाबच्या गुरदासपूर आणि पठाणकोट येथे ५ ऑक्टोबरच्या रात्री पाकच्या ड्रोनने भारतात घुसखोरी केल्याचे उघड झाले. गुरुदासपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी या ड्रोनवर गोळीबार करून त्याला हाकलून लावले.
पंजाब के गुरदासपुर में उड़ता दिखा ड्रोन #Punjab #Drone
(@satenderchauhan) https://t.co/jOnjww2iHV— AajTak (@aajtak) October 5, 2021
पठाणकोट येथे भारत-पाक सीमेवरील बमियाल सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीजवळ हे ड्रोन दिसून आले. त्यावर सैनिकांनी गोळीबार केल्यावर ते दिसेनासा झाला. ते माघारी गेला कि खाली पडले ?, हे समजू शकले नाही. पाकिस्तान ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना शस्त्रे पाठवत असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.