१५ वर्षीय मुलीवर ३ दिवस बलात्‍कार करणार्‍या वडिलांना अटक !

दहावीच्‍या परीक्षेनंतर घरी रहाण्‍यासाठी आलेल्‍या मुलीवर ५५ वर्षीय पित्‍याने बलात्‍कार केला. या प्रकरणी वडिलांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून त्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मानखुर्द (मुंबई) येथे शेजारी रहाणार्‍या सराईत गुंडाने महिलेला गोळी घालून मारले !

मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्‍यांच्‍या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला आणि त्‍यात तिचा मृत्‍यू झाला.

धरणगाव (जिल्‍हा जळगाव) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा !

सविस्‍तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकचा झेंडा फडकेल ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली,   ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी पू. भिडेगुरुजीनी विस्तृतपणे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी प्रशासन आणि शासन कटीबद्ध ! –  जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला !

कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रम रात्री १० च्या पुढे जात आहे, तर बंद करण्यास पुढाकार का घेतला नाही ? आणि वर पोलीस कारवाई झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा बेदरकारपणा झाला.

सरकारी सेवेत रुजू झाल्यावर प्रलोभनांना बळी पडू नका ! – अजित पवार

सरकारी सेवेमध्ये लागल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती मध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना करातून मिळाले ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न !

ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे लांजा येथे तरुणांना आवाहन

पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘प्रत्येक हिंदु तरुणांनी पुढील २ वर्षे राष्ट्रासाठी झटून कष्ट केले पाहिजेत. गावागावांत, घराघरांत जाऊन आपला हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे ? भारतभूमी कशी श्रेष्ठ ? आहे, याविषयी सांगितले पाहिजे.’’

देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे कोल्हापूर येथे उद्घाटन ! 

भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्‍यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.