दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता दाट !

मुंबई – विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ७ ते ९ एप्रिल या काळात राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आय.एम्.डी.) वर्तवल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी !

श्रीकांत शिंदे

नागपूर – महायुतीमधील बहुप्रतिक्षित कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांची उमेदवारी घोषित केली.


वाशीच्या बाजारात पिवळी कलिंगडे !

नवी मुंबई – वाशीच्या घाऊक बाजारात सध्या लाल नव्हे, तर चक्क पिवळी कलिंगडे आली आहेत. या कलिंगडांविषयी काहींच्या मनात शंका आहे, तर काहींना कुतूहलही वाटत आहे. ‘ही कलिंगडे चांगली आहेत ना ?’, असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. यांचा दर ७० ते ८० रुपये म्हणजे दुप्पट आहे. ही कलिंगडे चवीला अतिशय गोड आहेत. सोलापूर येथून या कलिंगडांची आवक झाली आहे.


गांजा आणायला नकार दिल्याने मारहाण !

विलेपार्ले – प्रवीण कांगे (वय २५ वर्षे) याने प्रमोद पंडा (वय २२ वर्षे) याला गांजा आणून देण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने त्याच्या डोक्यात कांगे याने लोखंडी खुर्ची घातली. कांगे याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

संपादकीय भूमिका 

व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम !


पिस्तूल विकणारी धर्मांध महिला कह्यात !

विलेपार्ले – नगमा हनीफ ही २७ वर्षीय धर्मांध महिला पूजा लिडे हे हिंदु नाव धारण करून येथील पडीक शौचालयाजवळ पिस्तुल विकण्याकरता आली होती. पोलिसांना याची माहिती आधीपासूनच असल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून तिला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका 

अल्पसंख्यांक महिलांचा शस्त्रास्त्र गुन्हेगारीतही सहभाग !


स्कायवॉकचा पत्रा डोक्यावर पडून तरुणी गंभीर घायाळ !

भाईंदर – मीरा रोड येथे स्कायवॉकला लावलेला पत्रा कोसळून त्याच्या खालून जाणारी एक तरुणी गंभीर घायाळ झाली आहे. या प्रकरणी पत्रा लावणारे आणि त्याची डागडुजी करणारे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नियती चौबड (वय १९ वर्षे) असे तरुणीचे नाव आहे. तिच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत.

संपादकीय भूमिका 

कामात हलगर्जीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना कारागृहात डांबा !