प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी अस्वच्छ हौदाची स्थिती उघड करताच स्वयंसेवकांकडून तात्काळ स्वच्छता !

खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्‍यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.

मोशी (पुणे) मध्ये गरजणार ‘जय श्रीराम’ नामाचा गजर !

‘श्री नीलेशशेठ बोराटे सोशल फाऊंडेशन’ यांच्या वतीने ह.भ.प. बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी जवळ मोशी चिखली येथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जुन्नर (पुणे) येथे बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळून आला !

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी ‘ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीन’मध्ये निरोध, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले सामोसे मिळाले होते. त्यानंतर आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर मिळाला आहे;

वसंतगड (कराड) येथे २४ एप्रिलपासून ‘शिवसंस्कार शिबिरा’चे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जन्मगाव असलेल्या तळबीड येथे वसंतगड मोठ्या दिमाखात उभा आहे.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास प्रारंभ  !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हरियाणातील राखी गढी येथे साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह सापडले !

हरियाणातील राखी गढी येथे हडप्पा संस्कृतीतील सर्वांत पुरातन वसाहतीच्या उत्खननाला मोठे यश आले आहे. साडेचार सहस्र वर्षांपूर्वीचे प्रसाधनगृह मातीच्या लोट्यासह (तांब्यासह) सापडले आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची तक्रार !

राजकीय नेते आणि उमेदवार यांनी लहान मुलांना हातात धरून, वाहनात किंवा फेरीत घेऊन जाणे, तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

खोपोली येथील सनातन संस्थेच्या अध्यात्म कार्यशाळेला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला खोपोली येथील जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.